पॅरिस : भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी सामना पार पडला. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्य पदाकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली. कांस्य पदकाच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारताने कांस्य पदकावर नाव कोरले.
भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची लढत रोमांचक झाली. भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला. यामुळं दोन्ही संघांना गोल करता आला नाही. भारताविरुद्ध दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोल केला. स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेस याने केला.
दरम्यान, स्पेनने आघाडी घेतल्यानंतर भारतानेन जोरदार कमबॅक केले. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत भारतीय संघाने आक्रमक खेळ करत मॅचमध्ये बरोबरी साधली होती. हरमनप्रीत सिंगने भारतासाठी पहिला गोल 30 व्या मिनिटाला केला होता. तर, दुसरा गोल हरमनप्रीत सिंगनं 33 व्या मिनिटाला केला. यामुळे भारताने मॅचमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. भारताने यापूर्वी स्पेन विरोधात झालेल्या दोन्ही मॅच जिंकल्या होत्या. भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले होते.
Belgaum Varta Belgaum Varta