Sunday , December 7 2025
Breaking News

भारताच्या लेकींनी मैदान गाजवले, ऑस्ट्रेलियाला नमवत भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

Spread the love

 

ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा

मुंबई : जेमिमाह रॉड्रिग्ज हीने केलेल्या चाबूक शतकाच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईतील डी. वाय  पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतासमोर 339 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान पूर्ण करणार का? असा शंका उपस्थित केली जात होती. मात्र भारतीय महिला संघाने इतिहास घडवत कांगारुंचा विजयरथ यशस्वीपणे रोखला. भारताने हे आव्हान 48.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि फायनलचं तिकीट मिळवलं. भारताने यासह गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं पॅकअप केलं. तसेच साखळी फेरीतील पराभवाची अचूक परतफेड केली आहे. आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.

भारताचा कडक विजय
भारताच्या या विजयात जेमिमा आणि कॅप्टन हरमनप्रीत या दोघींनी बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. तसेच इतरांनीही निर्णायक योगदान दिलं. जेमिमा आणि हरमनप्रीत या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. तसेच स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या दोघींनी निर्णायक योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी ऋचा घोष आणि अमनजोतने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टीम इंडियाची बॅटिंग
प्रतिका रावल हीच्या जागी आलेल्या शफाली वर्मा हीने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र शफाली 10 धावावंर बाद झाली. भारताने 13 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर जेमी आणि स्मृती मंधाना या दोघींनी भारताचा डाव सावरला. या दोघींनी काही वेळ स्कोअरकार्ड हलता ठेवला. स्मृतीकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र स्मृतीच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. त्यामुळे भारताचा स्कोअर 2 आऊट 59 असा झाला होता.

तिसऱ्या विकेट्ससाठी निर्णायक भागीदारी
त्यानंतर जेमी आणि कॅप्टन हरमनप्रीत या दोघींनी बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. जेमिमा आणि हरमनप्रीत या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. जेमी आणि हरमप्रीतने 167 रन्सची पार्टनरशीप केली. हरमनप्रीतला शतकाची संधी होती. मात्र हरमनप्रीत 89 धावांवर आऊट झाली आणि ही जोडी फुटली.

हरमननंतर जेमी आणि दीप्ती शर्मा ही जोडी जमली होती. मात्र जेमीच्या शतकाच्या घाईगडबडीत दीप्ती शर्मा रन आऊट झाली. दीप्तीने 24 धावा केल्या. दीप्तीनंतर मैदानात आलेल्या ऋचा घोष हीने जेमीला अप्रतिम साथ दिली. जेमी आणि ऋचा जोडीने पाचव्या विकेटसाठी 46 धावा जोडल्या. ऋचा चांगली फटकेबाजी करत होती. मात्र ऋचा फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाली. ऋचाने 16 बॉलमध्ये 26 रन्स केल्या.

त्यानंतर जेमीने अमनजोत कौर हीच्यासह 15 बॉलमध्ये 31 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. जेमीने नॉट आऊट 127 रन्स केल्या. जेमीने या खेळीत 14 चौकार लगावले. अमनजोतने नाबाद 15 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी कीम गार्थ आणि अनाबेल सदरलँड या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 338 रन्स उभारल्या. ऑस्ट्रेलियासाठी फोबी लिचफिल्ड हीने शतक झळकावलं. फोबीने 119 रन्स केल्या. एलिसा पेरी 77 आणि एश्ले गार्डनरने 63 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारतासाठी दीप्ती शर्मा आणि श्री चरणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

About Belgaum Varta

Check Also

मुलाच्या एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Spread the love  दुबई : श्रीलंकेचा उदयोन्मुख क्रिकेटपटू दुनिथ वेलालागेला मोठा धक्का बसला आहे. दुनिथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *