

मुंबई : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात १५ शिलेदारांची नावे आज जाहीर करण्यात आली. शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना १५ जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही. तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती यांच्याह १५ जणांची निवड करण्यात आली आहे. अजित आगरकर आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाची घोषणा केली. मुंबईकर श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, नितीशकुमार रेड्डी, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत यांना १५ जणांच्या चमूमध्ये स्थान मिळाले नाही.
भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये २०२६ चा टी२० विश्वचषक होणार आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. २० या स्पर्धेत २० संघ ४ गटात विभागण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ७ फेब्रुवारीला भारत आणि अमेरिका संघात होईल.

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार)
अभिषेक शर्मा
हार्दिक पांड्या
शिवम दुबे
तिलक वर्मा
संजू सॅमसन (विकेटकीपर)
इशान किशन (विकेटकीपर)
रिंकू सिंह
वरूण चक्रवर्ती
कुलदीप यादव
अक्षर पटेल (उपकर्णधार)
वॉशिंगटन सुंदर
जसप्रीत बुमराह
अर्शदीप सिंह
हर्षित राणा
मुख्य कोच – गौतम गंभीर
टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे वेळापत्रक
७ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई
१२ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली
१५ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
१८ फेब्रुवारी २०२६ – भारत विरुद्ध नेदरलँड्स, अहमदाबाद



Belgaum Varta Belgaum Varta