Wednesday , July 24 2024
Breaking News

भारत-दक्षिण आफ्रिका मालिका पावसाच्या हातात? हवामानाची स्थिती चिंता वाढवणारी

Spread the love

बेंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. कारण बंगळुरु शहरात उद्या पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मैदान असलेल्या परिसरात 88 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे अंतिम सामन्याचं भवितव्य पावसाच्या हातात असणार असचं दिसून येत आहे.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ सध्या मालिकेत 2-2 गुणांसह बरोबरीत असल्याने आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पण आता या सामन्यावर पावसाचं सावट उभ ठाकलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभर पाऊस ये-जा करण्याची शक्यता असून तापमान 27 अंश डिग्री सेल्सियस असेल. यावेळी 88 टक्के पावसाची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
मैदानातील रेकॉर्डही इंडियासाठी खराब
बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खास नसल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत इंडियाने इथे 5 टी20 सामने खेळले असून केवळ दोनच जिंकले आहेत. तीन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडियाने अंतिम टी20 सामना याठिकाणी सप्टेंबर, 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळला होता. त्यावेळी भारत 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला होता. त्यामुळे आज इंडियाला सावरुन खेळावं लागेल.

About Belgaum Varta

Check Also

भारताचा जगज्जेता संघ मायदेशी परतला; चाहत्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत

Spread the love  नवी दिल्ली : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *