Tuesday , March 3 2026
Breaking News

बंगळुरुमध्ये पावसाचा विजय, मालिका बरोबरीत

Spread the love

बंगळुरू : पावसामुळे निर्णायक सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे. बंगळुरु येथे सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. सामन्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे नाणेफेक झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावासाचे वातावरण पाहाता भारतीय संघाने विस्फोटक सुरुवात केली. 2.3 षटकांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस आला. त्यानंतर खेळ पुन्हा थांबवण्यात आला. त्यानंतर पाऊस थांबला तर 5-5 षटकांता सामना होईल, असे पंचांकडून जाहीर करण्यात आले. मात्र, पावसाने विश्रांती घेतलीच नाही. त्यामुळे पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका बरोबरीत सुटली. मालिकेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भुवनेश्वर कुमार याने चार सामन्यात सहा विकेट घेतल्या. यावेळी धावसंख्याही रोखण्याचं काम भुवनेश्वर कुमारनं केले.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
2015 – दक्षिण आफ्रिकेचा 2-0 ने विजय
2019 – मालिका 1-1 ने बरोबरीत
2022 – मालिका 2-2 ने बरोबरीत

2022 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत काय झाले?

2022 मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकाविरोधात एकाही मालिकेत विजय नोंदवता आला नाही. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 दक्षिण आफ्रिका वरचढ राहिलाय. दक्षिण आफ्रिकाने मायदेशात कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही 3-0 ने मात केली. तर भारतात झालेली मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली.
निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफिक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमीत कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असल्यामुळे केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून त्याने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकानं संघात तीन बदल केले. दक्षिण आफ्रिकाकडून टेम्बा बावुमा, तरबेज शम्सी आणि मार्को जेनसन यांना आराम देण्यात आलाय. त्यांच्याजागी ट्रस्टन स्टब्स, रिजा हेंड्रिक्स आणि कगिसो रबाडाला संघात स्थान दिले. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. विजयी संघ कायम ठेवण्यात आला होता.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *