Wednesday , December 10 2025
Breaking News

दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांचा; इंग्लंडची अवस्था 84/5

Spread the love

बर्मिंगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम खेळ दाखवला आहे. फलंदाजी करताना खराब सुरुवातीनंतरही पंत-जाडेजाच्या शतकाच्या जोरावर भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर गोलंदाजीतही कमाल करत दुसरा दिवस संपण्याआधी केवळ 84 धावांवर इंग्लंडचे पाच गडी तंबूत धाडले आहेत. ज्यामुळे आता इंग्लंडचा संघ 332 धावांनी पिछाडीवर असून सध्या कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत आहेत.
आधी इंग्लंडने गोलंदाजी घेतल्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. त्यावेळी पंतने 146 आणि जाडेजाने 104 धावा केल्या तर कर्णधार बुमराहने तुफान 31 धावा ठोकल्या. ज्यामुळे 416 धावा इंडियाच्या झाल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवातच खराब झाली अवघ्या तिसऱ्या षटकात ऍलेक्सला बुमराहने त्रिफळाचित केलं. मग चौथ्या षटकात जॅक क्रॉलीलाही बुमराहने मागे धाडलं. त्यानंतर तिसरा गडी ओली पोपच्या रुपात बुमराहनेच बाद केला. ज्यानंतर बेअरस्टो आणि रुट जोडीने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोहम्मद सिराजने अत्यंत महत्त्वाची अशी जो रुटची विकेट घेतली. रुट 31 धावा करुन बाद झाला. मग जॅक लीचलाही शून्यावर शमीने तंबूत धाडलं. अशाप्रकारे दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस इंग्लंडचे 5 गडी 84 धावांवर बाद झाले आहेत. ज्यानंतर आता तिसऱ्या दिवशी कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोसोबत फलंदाजीला येईल.

भारताचा पहिला डाव

सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानुसार इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचे सर्व आघाडीचे फलंदाज एक-एक करत तंबूत परतले. सलामीवीर गिल, पुजारा स्वस्तात बाद झाले. मग कोहली, विहारी आणि श्रेयस अय्यर यांनीही लगेचच पॅव्हेलियनचा रस्ता धरला. 100 धावांच्या आत भारताचे पाच फलंदाज बाद झाले होते. त्याचवेळी उपकर्णधार ऋषभ पंतने स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या मदतीने भारताचा डाव सावरला. पंत आणि जाडेजाने यांनी सहाव्या गड्यासाठी 222 धावांची दमदार भागिदारी केली. त्यानंतर दोघांनी आपआपली शतकं पूर्ण केली असून पंतने 146 तर जाडेजाने 104 धावा केल्या. त्यानंतर शमीने 16 धावा केल्या असून कर्णधार बुमराहने 16 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 416 धावा पहिल्या डावात केल्या.

About Belgaum Varta

Check Also

भारताने पाकिस्‍तानला लोळवले : एशिया चषकावर नाव कोरले

Spread the love  दुबई : दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *