नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिज दौर्यावर होणार्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. शिखर धवनला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या बड्या खेळाडूंना 17 सदस्यीय स्थान न देता त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दौर्यावर टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन असेल. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुल, ऋषभ पंतही संघाचा भाग नसतील. अशाप्रकारे सात महिन्यांत भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवा कर्णधार मिळणार आहे.
भारतीय संघ खालील प्रमाणे
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रणंद कृष्णा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिंग.
Belgaum Varta Belgaum Varta