लंडन : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 10 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जुलैला मँचेस्टरमध्ये होत आहे. मात्र याही वनडे सामन्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मुकण्याची शक्यता आहे. त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे विराट कोहली इंग्लंड विरूद्धची पहली वनडे खेळला नव्हता.
एएनआय वृत्तसंस्थेच्या बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीचा दुखावलेला मांडी स्नायू अजून बरा झालेला नाही. त्यामुळे तो दुसर्या वनडे सामन्याला देखील मुकण्याची शक्यता आहे. केनिंग्टन ओव्हलवर मंगळवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta