सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवले
सिंगापूर : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत खालच्या मानांकित जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली. या वर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणार्या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने 32 मिनिट सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेईना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव केला.
उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूचा एकहाती विजय
पीव्ही सिंधूने चीनच्या हान युईचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूने पहिला सेट गेम गमावल्यानंतर 17-21, 21-11, 21-19 असा विजय मिळवला होता. सिंधूसाठी उपांत्यपूर्व फेरीचा सामना जितका कठीण होता, तितकाच उपांत्य फेरीतील सामना सोपा होता. तिने कावाकामीचा अवघ्या 30 मिनिटांत कावाकामीचा पराभव केला.
विजेतेपदाच्या लढतीत कोणाशी सामना?
सिंगापूर ओपनच्या विजेतेपदाच्या लढतीत पीव्ही सिंधूचा सामना जपानच्या अया ओहोरी किंवा चीनच्या जी यी वांग यांच्याशी होईल. जपानच्या अया ओहोरीनं उपांत्यपूर्व फेरीत भारतीय स्टार सायना नेहवालचा 21-13, 15-21, 22-10 असा पराभव केला होता. ओहोरीला आता विजेतेपदाच्या लढतीत सिंधूचा सामना करण्यासाठी जी यी वांगला पराभूत करावे लागेल.