भारताकडून असा विक्रम करणारा सहावा खेळाडू
मोहाली : विराट कोहली आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील 100 वी कसोटी खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 38 धावा करत विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कसोटी क्रिकेटमधील 8 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धावा करणारा विराट कोहली भारताचा सहावा खेळाडू आहे. याआधी आधी सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड, लिटल मास्टर सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.
कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धाव करण्यासाठी 169 डाव घेतले. हा टप्पा सचिन तेंडुलकरने 154 डावांमध्ये गाठला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे तर, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8 हजार धावा करण्याचा विक्रम आहे. 8 हजार धावा करण्यासाठी त्याने 152 डाव घेतले. राहुल द्रविडने 158, वीरेंद्र सेहवागने 160 आणि सुनील गावस्करने 166 डावात हा पराक्रम केला.
Check Also
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड
Spread the love नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …