नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम केले असून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसर्या स्थानावर पकड भक्कम झाली आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानसाठी भारताला मागे टाकणे कठीण असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवून भारताने आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले होते. सध्या भारताचे 109 रेटिंग गुण असून पाकिस्तानचे 106 आहेत. तर, न्यूझीलंडचा संघ 128 रेटिंग गुणांसह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा संघ भारताकडून पराभूत होऊनही 121 रेटिंग गुणांसह दुसर्या क्रमांकावर कायम आहे. तर 101 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे.
Belgaum Varta Belgaum Varta