लंडन : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाविरुद्धची मालिका हरल्यानंतर बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला रामराम घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून तो टी-20 आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.
बेन स्टोक्स निवृत्तीबाबत म्हणाला की, तीनही क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी आता शक्य नाही. तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी माझे शरीर आता साथ देत नाहीये. व्यस्त वेळापत्रकामुळे खूप दमछाक होते. तसेच मला असे वाटते की मी एका दुसर्या खेळाडूची जागा देखील घेत आहे. तो खेळाडू जॉस बटलर आणि संघासाठी आपले 100 टक्के देऊ शकतो.
दरम्यान, वेन स्टोक्सच्या डोक्यात कसोटी क्रिकेटवर फोकस करण्याचा विचार हा आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या सुरूवातीपासूनच घोळत होता. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर आल्यानंतर आयपीएलमधून माघार घेतली होती. आता स्टोक्स फक्त कसोटी खेळणार की टी 20 देखील खेळणार याबाबत संभ्रम आहे. तसेच तो आयपीएलसाठी देखील उपलब्ध असणार की नाही हे गुलदस्त्यातच आहे.
Belgaum Varta Belgaum Varta