Tuesday , December 3 2024
Breaking News

मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

Spread the love

 

भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर

बर्मिंगहम: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन उचलत मीराबाईनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

यावेळी मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 88 किलोग्राम वजन उचलत मीराबाईने आपली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे त्याने एकूण (113+88) 201 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा रेकॉर्ड करत मीराबाईने गोल्ड जिंकवून दिलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या मीराबाईकडून कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती, जी तिने पूर्ण करत भारतासह स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय वेटलिफ्टर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. आजच्या दिवसात भारताने मिळवलेलं हे तिसरं पदक आहे. आधी संकेत सरगर मग गुरुराज पुजारी यांनी अनुक्रमे रौप्य आणि मग कांस्य पदक मिळवलं.

वेटलिफ्टिंगमधील तिसरं पदक

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आज दिवसभरात तीन पदकं मिळवली आहे. सर्वात आधी 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवलं. त्यानंतर आता 61 किलो वजनी गटात एकूण 269 किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवलं आहे. त्यामुळे स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांना गवसणी घातली आहे.

About Belgaum Varta

Check Also

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Spread the love  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *