बंगळुरू : प्रज्वल रेवन्ना प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने उच्च न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. आरोपी माजी जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांची आई, भवानी रेवन्ना, लैंगिक छळातील पीडितांचे अपहरण करायची. पीडितांना पोलिसात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी त्या त्यांच्या संपर्कात होत्या, अशा खुलासा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने केलाय. दरम्यान लैंगिक शोषणाचे हे प्रकरण लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आले होते, हे प्रकरण उघडकीस येईपर्यंत कर्नाटकातील सर्व जागांवर मतदान झाले होते.
दरम्यान उच्च न्यायालयात भवानी रेवन्ना ह्यांनी १४ जून रोजी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी वेळी विशेष पथकाने ५५ वर्षीय भवानी ह्याच लैंगिक अत्याचार पीडितेच्या अपहरणाचा मास्टरमाईंड आणि किंगपिन होत्या असे सांगितले.
सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला आहे. परंतु ७ जून रोजी अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण एक आठवड्यासाठी वाढविले आहे. तसेच भवानी यांना एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. दरम्यान भवानी रेवन्ना ह्या ७ पीडितांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी झाल्या असल्याचे तपासात समोर आल्याचे न्यायालयाने सुनावणी करताना सांगितले आहे.