रायचूर : रायचूर जिल्ह्यातील सिरावर तालुक्यातील कल्लूर गावात मटण खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
भीमन्ना (60), इरम्मा (54), मल्लेश (19) आणि पार्वती (17) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मल्लम्माची प्रकृती चिंताजनक असून तिला रायचूर येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मटण शिजवताना सरडा पडल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta