बेंगळुरू : मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात म्हैसूर लोकायुक्तात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लोकायुक्त एडीजीपी मनीष करबीकर यांच्या सूचनेनुसार म्हैसूर लोकायुक्त एसपी उदेश यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या एफआयआरमध्ये ए 1, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती ए 2, पार्वती यांचा भाऊ मल्लिकार्जुन स्वामी ए 3 आणि जमीन विक्रेता देवराजू ए 4 यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापुढे आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात लोकायुक्त चौकशीचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर ४८ तासानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta