सीबीआय अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
बंगळूर : कारवारमधील काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांना बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व गुन्हेगारांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश देऊन सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सैल यांना न्यायालयाच्या आवारात ताब्यात घेतले आहे.
११,३१२ मेट्रिक टन जप्त खनिजाची परवानगी न घेता वाहतूक करण्यात आली. या प्रकरणी याचिकेवर सुनावणी करणारे लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानना भट यांनी महेश बिलिये, मल्लिकार्जुन शिपिंग आणि आमदार सतीश सैल यांना दोषी ठरवून उद्यापर्यंत (ता. २५ ऑक्टोबर) शिक्षेचा निर्णय राखून ठेवला आहे.
लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज एकूण ६ प्रकरणांमध्ये अंतिम आदेश दिला. बेलेकेरी खनिज गायब झाल्याप्रकरणी दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. आता न्यायालयाच्या आवारातून आरोपींना ताब्यात घेतलेले सीबीआय अधिकारी त्यांना परप्पन येथील अग्रहार कारागृहात हलवणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta