बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी विधानसभेतील भाजपच्या 18 आमदारांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. सभापतींच्या खंडपीठाचा अनादर केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 18 आमदारांना तत्काळ 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना तातडीने विधानसभा सोडण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत.
लोकशाही व्यवस्थेत सभापतींच्या खंडपीठाचा आदर केला जातो, परंतु भाजपच्या 18 आमदारांनी विधेयके फाडून, स्पीकरवर फेकून, सीडी दाखवून सभापतींच्या खंडपीठाचा अनादर केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
आमदार दोड्डनगौडा पाटील, अश्वत्थनारायण, भरत शेट्टी, शरणू सलगार, बी. सुरेश गौडा, मुनीरत्न, उमानाथ कोट्यान, बी. पी. हरीश, धीरज मुनिराजू, शैलेंद्र बेलदाळे, बसवराज मत्तीमुडा यांच्यासह 18 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.