Tuesday , March 3 2026
Breaking News

अभिनेते कमल हासन यांचे कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कर्नाटकात तीव्र निषेध

Spread the love

 

बेंगळुरू : चेन्नई येथे झालेल्या आगामी ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी एक वक्तव्य केले. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कन्नड संरक्षण वेदिकेसारख्या कन्नड समर्थक संघटनांनी कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अशी वक्तव्ये भविष्यातही केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. इतकंच नव्हे तर कन्नड समर्थकांनी बेंगळुरूमधील ‘ठग लाइफ’ या चित्रपटाचे बॅनरसुद्धा फाडले.

कन्नड रक्षण वेदिकेचे नेते प्रवीण शेट्टी म्हणाले, “जर तुम्हाला कर्नाटकात व्यवसाय करायचा असेल तर अशी अपमानास्पद वक्तव्ये करू नयेत अशी आम्ही त्यांना ताकीद देतो. आज आम्ही त्यांच्यावर काळी शाई फेकण्यास तयार होतो, पण ते कार्यक्रम स्थळ सोडून निघून गेले. कर्नाटकात तुमच्या चित्रपटावर बंदी घातली जाईल, असा थेट इशारा आम्ही देतो.”

कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित कमल हासन यांना फटकारले. ‘कलाकारांनी सर्व भाषांचा आदर केला पाहिजे. त्यांनी केवळ कन्नड भाषेचाच अपमान केला नाही तर अभिनेते शिवराजकुमार यांचं नाव वापरून तमिळ भाषेची स्तुती करणंदेखील चुकीचे आहे. कन्नड भाषेला 2500 वर्षांहून अधिक जुना सांस्कृतिक वारसा आहे. अशा वक्तव्यांनी या वारशाला कमी लेखता येणार नाही. कमल हासन यांनी याआधीही हिंदू धर्म आणि धार्मिक भावनांचा अपमान केला होता. आता त्यांनी 6.5 कोटी कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी कन्नड भाषिकांची निर्विवाद माफी मागावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *