बेंगळुरू : स्वातंत्र्यदिनी कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये एक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये १० घरे उद्ध्वस्त झाली असून १ ठार तर ८ हून अधिक लोक गंभीर जखमी झाली.
बेंगळुरूमधील विल्सन गार्डनजवळील चेन्नय्यानपाल्यात एक संशयास्पद स्फोट झाला. एका घरात अचानक स्फोट झाला, ज्यामुळे घराच्या भिंती आणि शेजारच्या घरांच्या भिंती कोसळल्या. दहाहून अधिक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. हा सिलेंडरचा स्फोट नव्हता, आगीचाही नव्हता. परंतु कोणत्या स्फोटामुळे ही आपत्ती घडली हे कोणालाही माहिती नाही.
जखमींची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta