रामनगर : बागलकोट-मंगळूर केएसआरटीसी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडक दिल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बागलकोट येथील निलाव्वा हरडोळी (40) आणि जळीहाळ येथील गिरिजाव्वा बुडन्नावर (30) यांचा समावेश आहे. एका 45 वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही. येल्लापूरजवळ शुक्रवारी रात्री बागलकोट-मंगळूर केएसआरटीसी बसने धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरी रस्त्याच्या कडेला इंडिकेटरशिवाय उभी होती आणि भरधाव वेगाने येणाऱ्या बसने तिला मागून धडक दिली. यामुळे बसचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. बस चालक यमनप्पा मागी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta