

विजापूर : शेततळ्यात पाय घसरून पडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. एका मुलासह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची ही दुर्घटना विजापूर तालुक्यातील मिंचनाळ तांडा येथील मादेव नगरात घडली आहे.
शिवम्मा राजू राठोड (८), कार्तिक विश्वा राठोड (७) आणि स्वप्ना राजू राठोड (१२) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. ही मुले मेंढ्यांसोबत खेळत खेळत शेततळ्याच्या (कृषी हौद) जवळ गेली होती. खेळण्याच्या ओघात त्यांचा पाय घसरला आणि ते शेततळ्यात पडून बुडाले. घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती मिळताच विजापूरचे तहसीलदार चेनगोंडा आणि विजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ही घटना विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta