
बेळगाव : कर्नाटक सरकारने बेंगलोर वरील ताण कमी करण्यासाठी आयटी क्षेत्र बेंगलोर शहराबाहेर विस्तारित करण्यासाठी कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन जाहीर केली असून त्याचा फायदा राज्यातील सात मोठ्या शहरांना होणार आहे. असे झाल्यास भविष्यात बेळगाव सारख्या शहरात नवीन आयटी पार्क रोजगार संधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक राज्यातील म्हैसूर, मंगळूर, कलबुर्गी, दावणगिरी, हुबळी -धारवाड याबरोबरच बेळगाव शहराला याचा थेट फायदा होणार आहे. आयटी धोरण 2025-30 च्या मसुद्यानुसार बेंगलोर शहराच्या बाहेर युनिट सुरू करणाऱ्या आयटी आणि आयटीइएस कंपन्यांना पुढील प्रमाणे सवलती देण्यात येणार आहेत.
यामध्ये पाच टक्के भाडे परतावा दोन कोटी रुपयांपर्यंत, मालमत्ता करात 30 टक्के परतावा तीन वर्षांसाठी, वीज शुल्कावर 100% सूट पाच वर्षांसाठी, दूरसंचार व इंटरनेट खर्च 25% परतावा 12 लाखांपर्यंत देण्यात येणार आहे. राज्य सरकारचा पुढील पाच वर्षात 445 कोटींच्या गुंतवणुकीतून बेंगलोर शहराबाहेर आयटी क्लस्टर करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील वाढत्या ट्रॅफिक पायाभूत सुविधा असेच रियल इस्टेटच्या वाढत्या खर्चामुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्रांकडे वळविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रोत्साहन श्रेणीमध्ये शंभर अर्जदारांची मर्यादा ठेवून सरकारने टप्प्याटप्प्याने नवीन कंपन्या शहरात आणण्याची आखणी असून एकाच खिडकीतून परवानगी आश्रम कायद्यातील सवलती डिजिटल प्लॅटफॉर्म अतिरिक्त सुविधा देखील देण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta