
बागलकोट : बागलकोट जिल्ह्यात सिद्धापूर गावाजवळ काल रात्री भरधाव वेगात आलेल्या एका कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या विश्वनाथ कंबार (१७), प्रवीण शेडबाळ (२२), गणेश अळ्ळीमट्टी (२०) आणि प्रज्वल शेडबाळ (१७) या चौघा दुर्देवी तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुण जमखंडी तालुक्यातील सिद्धापूर गावचे रहिवासी आहेत. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला होता, त्यामुळे पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले.या घटनेची माहिती मिळताच जमखंडी ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta