
बेळगाव : ज्येष्ठ काँग्रेस आमदार आणि अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. वृद्धापकाळामुळे काही आजारांनी ग्रस्त असलेले शमनूर शिवशंकरप्पा यांना उपचारासाठी बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारांचा उपयोग झाला नाही. आज संध्याकाळी ६:४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शमनूर शिवशंकरप्पा सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या स्पष्ट शब्दांसाठी ओळखले जात होते. त्याचप्रमाणे दावणगिरी भागात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या करून त्यांनी शिक्षण महर्षी असा लौकिक मिळविला होता.
Belgaum Varta Belgaum Varta