Thursday , April 9 2026
Breaking News

बारावी परीक्षेचा आज निकाल

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (केएसईएबी) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा-१ चा निकाल उद्या, ९ एप्रिल २०२६ रोजी जाहीर होणार आहे. मंडळाच्या पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा निकाल प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यंदाच्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान राज्यभर पार पडल्या. या परीक्षेसाठी एकूण ७,१०,३६३ विद्यार्थी नोंदणीकृत होते. राज्यातील १,२१७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आल्या.

यापूर्वी मंडळाने ७ एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले होते. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे आवश्यक परवानगी प्रक्रियेमुळे निकाल जाहीर करण्यात विलंब झाला. आता निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करण्यास मंजुरी दिल्याने उद्या निकाल प्रसिद्ध होणार आहे.

karresults.nic.in
kseab.karnataka.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.

राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत असून, आता प्रतीक्षेची वेळ संपत आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवकुमार स्वामी म्हणजे समाजाच्या आत्म्याला आकार देणारे संत

Spread the love  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू; ११९ व्या जयंतीनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बंगळूर : शिवकुमार स्वामींसारखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *