बेंगळुर : सर्वाधिक दरवाढ, महागाई करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते. त्यामुळे दरवाढीवरून आंदोलन करण्याचा काँग्रेसला अधिकार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज काँग्रेसला फटकारले.
बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आज उडुपी येथे होणार्या विविध विकास कार्यक्रमांत भाग घेणार आहे. उद्या मंगळुरात पक्षाची संघटनात्मक बैठक आहे. त्यात भाग घेऊन 13 एप्रिलला बंगळूरला परतणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दरवाढीवरून काँग्रेसने सुरु केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले महागाई, दरवाढीवरून आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही. कारण देशात सर्वाधिक महागाई, दरवाढ काँग्रेसनेच केली होती. पीएसआय भरतीत गैरव्यवहार झाल्याबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
अल्ला हू अकबर अशी घोषणा देणार्या मंड्या येथील मुस्कान या विद्यार्थिनीचे अल कायदा प्रमुखाने कौतुक केले, याचे काय कनेक्शन आहे असा प्रश्न विचारणारे पत्र अनंतकुमार हेगडे यांनी पाठवले होते. त्याबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, हे काय प्रकरण आहे माहित नाही. याबाबत अनंतकुमार हेगडे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांच्याकडे याबाबत काही माहिती असेल तर त्याआधारे पुढील कारवाई करू असे त्यांनी सांगितले. मंड्याच्या खासदार सुमलता अंबरीश भाजपमध्ये प्रवेश करणार काय या प्रश्नावर सुमलता या बहिणीच्या मुलीची लग्नपत्रिका देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी केवळ काही विकासकामांवर चर्चा झाल्याचे बोम्मई यांनी स्पष्ट केले.
Check Also
9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन
Spread the loveबेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे …