Wednesday , April 16 2025
Breaking News

राज्यातील वीज निर्मितीवर कोणताही परिणाम नाही : सुनीलकुमार

Spread the love

बंगळूर : राज्यात अतिरिक्त वीज असल्याचे सांगून उर्जा मंत्री व्ही. सुनीलकुमार मंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यातील वीजेच्या तुटवड्याचे विरोधी पक्षांचे आरोप निराधार आहेत.
किंबहुना इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीजपुरवठा व्यवस्थित आहे. राज्याने १४ हजार ८०० मेगावॅटपर्यंत विजेची गरज पूर्ण केली आहे. सध्या उन्हाळा डोळ्यासमोर ठेवून वीजनिर्मिती व पुरवठा केला जात आहे. जर आपल्या राज्यात विजेची मागणी कमी झाली तर आपण इतर राज्यांनाही वीज पुरवू शकतो.
सध्या राज्याला दररोज १३ ते १५ रेक कोळशाचा पुरवठा केला जातो. कोळशाचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी राज्य केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. राज्यात पुरेसा कोळसा आहे.
मंत्री पुढे म्हणाले की, सिंचन पंप संच फीडरला सौरऊर्जा जोडणी देण्याचे उद्दिष्ट असलेल्या पंतप्रधान कुसुमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा राज्यातील २.५ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
या संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या कार्यक्रमाचे जास्तीत जास्त लाभार्थी असतील तेथे बेस्कॉम आणि हेस्कॉम यांच्यामार्फत लवकरच हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होणार आहे.
नवीन आणि नवीकरणीय संसाधन मंत्रालयाने या प्रकल्पाद्वारे ९६० मेगावॅट वीज निर्मिती करण्यास मान्यता दिली असून मंत्रालयाकडून परवानगी पत्र मिळाल्यानंतर लवकरच निविदा काढण्यात येईल.

About Belgaum Varta

Check Also

हुबळी : ५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीचा एन्काऊंटर

Spread the love  हुबळी : हुबळी येथील एका ५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *