Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक : सर्व एक्स्प्रेससाठी तिकीट काऊंटर सुरु; दोन वर्षांनंतर प्रतीक्षा संपली

Spread the love

बेळगाव : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी आता तिकीट काऊंटर सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ दोनच एक्स्प्रेस गाड्याना रेल्वेचा प्रवासी तिकीट आणि मासिक पास सुरु करण्यात आला होता. आता पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी होत आहे.
मे महिन्यापासून टप्प्याटप्याने 9 एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे पास आणि तिकीट काऊंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली होती. त्यानुसार शनिवारपासून सर्वच गाड्यांना तिकीट काऊंटर सुरु करण्यात आले आहे. यामुळे आता जनरल डब्यासाठी काऊंटरवरच तिकीट उपलब्ध होत आहे.
बेळगाव-बंगळूर-बेळगाव आणि चन्नम्मा एक्स्प्रेस मिरज-बंगळूर- मिरज या दोनच गाड्यांना रेल्वे प्रवासी पास आणि जनरल डब्यासाठी तिकीट काऊंटर आणि रेल्वे प्रवासी पास सुरु करण्यात आले होते. इतर एक्स्प्रेसना तिकीट बुक करुनच प्रवास करावा लागत होता.
आता 9 एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रवासी पास (सिझनल तिकीट) देण्यात येत आहे. गोवा- निजामउद्दीन एक्स्प्रेस (क्र.12779), यशवंतपूर-निजामुद्दीन (क्र. 12629) एक्स्प्रेस, यशवंतपूर-गांधीधाम एक्स्प्रेस (क्र. 22685), म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस (क्र. 12781), यशवंतपूर-जोधपूर एक्स्प्रेससाठी (क्र.16534), बंगळूर-जोधपूर (क्र. 1608), यशवंतपूर अजमेर (क्र.1632) गांधीधाम-बंगळूर (क्र. 16065) आणि म्हैसूर-दादरसाठी तिकीट काऊंटर आणि रेल्वे प्रवासी पास देणे सुरु करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *