
१९ मे रोजी एसएसएलसी परीक्षेचा निकाल
बेंगलोर : एसएसएलसी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ येत्या १९ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. त्याचप्रमाणे सोमवार १६ मे पासून कर्नाटकात शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. मडिकेरी येथे शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी ही माहिती देऊन सांगितले की, २८ मार्च ते ११ एप्रिल या काळात राज्यात एसएसएलसी परीक्षा घेण्यात आली. १५ मे रोजी निकाल जाहीर करण्याचा परीक्षा मंडळाचा विचार होता. मात्र एकापाठोपाठ सुट्या आल्याने निकालाला वेळ लागला आहे. राज्यातील २३४ पेपर तपासणी केंद्रांवर ६३,७९६ शिक्षकांनी पेपर तपासणी केली आहे. ३,४४६ परीक्षा केंद्रांवर एकूण १५,३८७ विध्यार्थ्यानी यावर्षी एसएसएलसी परीक्षा दिली आहे. उत्तीर्ण होण्यासाठी काहीच गन कमी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शेकडा १० ग्रेस मार्क्स देण्याचे सरकारने ठरविले आहे. जर ३ विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्वरित ३ विषयांत कमी गन मिळून अनुत्तीर्ण व्हावे लागत असेल तरच अशा विद्यार्थ्यांना गन देण्यात येईल. १९ मे रोजी सकाळी १०.३० वा विद्यार्थ्यांना वेबसाईटवर आपला निकाल पाहता येईल. निकालापाठोपाठ जूनच्या शेवटच्या आठवड्यात एसएसएलसीची पुरवणी परीक्षा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे १६ मे रोजी राज्यातील शाळा पूर्ववत नियमित भरतील, असे मंत्री नागेश यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta