Tuesday , March 3 2026
Breaking News

कोल्हापूर- बंगळूर बसचा हुबळीजवळ भीषण अपघात, ८ ठार, २८ जखमी

Spread the love

बेळगाव : कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणारी खासगी बस आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन 8 जण ठार झाले आहेत. मध्यरात्री 12 च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस नामक फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाब (55, चिकोडी), मोहम्मद दयान (17, मैसूर ) अशी दोन मृतांची नावे आहेत. 28 प्रवाशी जखमी असून त्यांना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *