बंगळूर : कर्नाटक विधानसभेतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या चारपैकी दोन जागांसाठी भाजपने रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अभिनेते आणि राजकारणी जग्गेश यांना उमेदवारांची घोषणा केली.
ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केलेले तिरुवेकेरेचे माजी आमदार जग्गेश यांची विधानसभा सदस्य म्हणूनही निवड झाली आहे. आता भाजपने आश्चर्यकारकरित्या त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले के. सी. राममूर्ती यांना यावेळी भाजपने तिकीट दिले नाही. मात्र जग्गेश यांचे नाव विचारात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यसभेच्या चार जागासाठी 10 जून रोजी निवडणुक होणार आहे, ज्यामध्ये भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य विधानसभेतील पक्षांच्या संख्याबळानुसार निवडून येऊ शकतो. काँग्रेस, भाजप आणि धजद या चारही पक्षांमध्ये चौथा उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ नाही. एका पक्षाला दुसर्या पक्षावर अवलंबून राहावे लागेल, अशी परिस्थिती आहे.
Check Also
सध्या राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
Spread the love इच्छुकांची नाराजी बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे वृत्त …