बेंगळुरू : आयएसआयएसशी संबंधित असलेल्या तीन दहशतवाद्यांना पोलिसांनी मंगळवारी कर्नाटकातील शिमोगा येथे अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे. दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या तिघांची शिमोगा पोलिसांनी ओळख पटविली आहे. त्यापैकी दोघांची ओळख पटली असून तिसऱ्या संशयितास देखील कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.
या तिघांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला यासिन हा आयडी बनविण्यात माहीर आहे. शरीख आणि मझर अशी इतर दोघांची नावे आहेत. या तिघांचा ही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. या संघटनेचा कर्नाटकात दहशतवादी हल्ले घडविण्याची योजना होती का याचा कर्नाटक पोलीस तपास करीत आहेत. आरोपी जबिउल्लाकडून मिळालेल्या माहितीनुसार शिमोगा येथे सावरकरांच्या छायाचित्रावरून उसळलेल्या हिंसाचारात या तिघांचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta