रमेश जारकीहोळीना हद्दपार करण्याची मागणी
बंगळूर : प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर, त्यांच्या समर्थकांनी आज (ता. ३१) माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी यांच्या बंगळुर येथील निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली.
शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी रमेश जारकीहोळी यांच्या हद्दपारीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.
काल बेळगावात पत्रकार परिषदेत शिवकुमार यांच्याविरुध्द फटकेबाजी करणार्या रमेश जारकीहोळी यांनी आपल्याविरोधात सीडी रचल्याप्रकरणी शिवकुमार यांना तुरुंगात पाठवावे, सीबीआयने या प्रकरणाचा संपूर्ण तपास करावा, अशी मागणी करून आपल्याकडे या संदर्भातअनेक कागदपत्रे असल्याचा दावा केला होता. सदर कागदपत्रे आपण तपासासाठी सीबीआयकडे देईन, असेही त्यांनी म्हटले होते.
माझ्याकडे १२० साक्ष आहेत. काहीही सोडले जात नाही. डी. के. शिवकुमार एक सीडी बनवत आहेत आणि बायलॉकला मेल करत आहेत. राज्य सरकारने याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जारकीहोळी यांनी केली होती.
रमेश – बोम्मई चर्चा
दरम्यान, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली.
रमेश जारकीहोळी यांनी काल बेळगावात पत्रकार परिषद घेऊन, शिवकुमार हे ब्लॅक मेलर आहेत. ते सीडी तयार करून सर्वांना ब्लॅकमेल करतात. एका तरुणीचा वापर करून त्यानी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. असा आरोप केला होता. त्यांनी शिवकुमार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. रमेश जारकीहोळी आज सकाळी बंगळुरला आले आणि त्यांनी रेसकोर्स रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सीडी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची त्यांनी मागणी केल्याचे समजते. सर्व गोष्टींचा कायद्याच्या चौकटीत अभ्यास करून निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta