Tuesday , March 3 2026
Breaking News

कर्नाटकातील चामराजनगरजवळ हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित

Spread the love

बेंगळूरू : भारतीय हवाई दलाचे सूर्य किरण ट्रेनर विमान गुरुवारी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्याजवळ कोसळले. चामराजनगर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगापूरा येथील मकाली गावाजवळ ही घटना घडली. “या दुर्घटनेतून एका महिलेसह दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहेत. त्यांना बंगळूरला एअरलिफ्ट करण्यात आले आहे,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

IAF चे एक सूर्य किरण ट्रेनर विमान आज कर्नाटकातील चामराजनगर जवळ नियमित प्रशिक्षणासाठी जात असताना कोसळले. विमानातील दोन पायलट बचावले आहेत. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत, असे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात राजस्थानच्या हनुमानगडमध्ये भारतीय हवाई दलाचे (IAF) एक मिग-२१ लढाऊ विमान कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षणादरम्यान कोसळले होते. या अपघातातून पायलट सुखरूप बचावला होता. त्याला किरकोळ दुखापत झाली होती. अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *