तुमकूर : पाण्यात पडलेल्या आईसह दोन मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीसह चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची तुमकूर येथील सिद्धगंगा मठाजवळ घडली.
गुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या खड्ड्यात पाय धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. मुलाला वाचवण्यासाठी गेलेली आईही बुडाली. दरम्यान, आईला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मुलगाही पाण्यात बुडाला. आई आणि दोन मुलांना पाण्यात बुडताना पाहणाऱ्या महादेवप्पा नावाच्या व्यक्तीने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली पण दुर्दैवाने त्या व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला.
क्यासांद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
Belgaum Varta Belgaum Varta