बंगळूर : उडुपी येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची पोलिसांचे पथक चौकशी करत आहे. सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे उडुपी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक के. अरुण यांनी बुधवारी सांगितले.
तांत्रिक पुरावे आणि गुप्तचर अहवालाच्या आधारे संशयित प्रवीण चौगले (वय ३९) याला बेळगावातील कुडची येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. चौगले यांच्या सहभागाची पुष्टी झाल्यास त्याला अटक आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. अनेक संशयितांची चौकशी सुरू असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुखानी पत्रकारांना सांगितले.
शोधकार्यात सहभागी असलेल्या पोलिसांच्या पाच पथकांनी सुमारे १५ ते २० जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. चौकशीत हत्येमागील हेतूसह महत्त्वाचे तपशील मिळतील, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या प्रकरणाचा अनेक अंगांनी तपास सुरू असून सर्व संशयितांची चौकशी केल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल, असे ते म्हणाले.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभर कडेकोट बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. एसपी, डीवायएसपी कार्यालय आणि परिसरात अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
चौगले यांना उडुपी पोलिसांनी बेळगाव येथे अटक करून उडुपी येथे आणले होते. डॉ. अरुण के यांनी नमूद केले की, प्रभारी अधिकाऱ्याने तपास अहवाल सादर केल्यानंतर पुढील तपशील प्रसारमाध्यमांना जाहीर केला जाईल.
उपलब्ध माहितीच्या आधारे चौगले हे सीआयएसएफ किंवा सीआरपीएफचे सदस्य नव्हते. उडुपी आणि बेळगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आरोपीला मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची येथून अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta