
बंगळूर : आपणास राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला.
बेकायदेशीर मिळकत प्रकरणात सीबीआयने त्यांना नोटीस बजावल्याबद्दल शहरातील पत्रकारांना उत्तर देताना, उपमुख्यमंत्री म्हणाले, की राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावण्यात आली आहे. माझा छळ करून मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे. यात कांही मोठे लोक आहेत, त्यांचे मोठे षडयंत्र सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.
सरकारने आधीच केस मागे घेतली आहे. मात्र, ते कोणत्या कारणाने नोटीस दिली माहित नाही. त्यांना वैयक्तिक नोटीस मिळाली आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, सीबीआय प्रथम त्यांचा तपास फर्म स्तरावर पूर्ण करेल आणि नंतर त्यांच्या मागे येईल. हे सर्व पत्नी आणि मुलांबद्दल आहे. मग ते वैयक्तिकरित्या माझ्याकडे येतील. मला आत टाकण्यात रस असेल तर टाकू द्या, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
मी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे मला कशाचीही भीती नाही. मला न्याय मिळेल. सरकारने हे प्रकरण लोकायुक्तांना आधीच दिला आहे. लोकायुक्त पुढील चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेल्या शिवकुमार यांनी २०१९ मध्ये तिहार तुरुंगात ५१ दिवस काढले होते.
Belgaum Varta Belgaum Varta