Tuesday , March 3 2026
Breaking News

लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी : बी. वाय. विजयेंद्र माहिती

Spread the love

 

बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले.

बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी तयारी करावी.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी करा. आपण कोणालाही हलके घेऊ नये. पंतप्रधान मोदींचे सरकारचे कार्यक्रम घरोघरी पोहोचवले पाहिजेत. सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. आम्हा सर्वांना भाजपचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *