Sunday , September 8 2024
Breaking News

कानडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा ‘कोरोना’ ने मृत्यू

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील मराठी विद्यामंदिर कानडी शाळेचे अध्यापक राजेंद्र नारायण तुपे, वय ३९ यांचे कोरोनामुळे निधन झाले. या  घटनेने शैक्षणिक वर्तुळात घबराट पसरली आहे.
      कानडी येथील कोरोना दक्षता कमिटीचे सदस्य असलेले तुपे आठ दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव आल्यापासून गडहिंग्लज येथे उपचार घेत होते. तथापि उपचार सुरू असताना त्यांचे १ जून रोजी निधन झाले.
  तूपे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील गोंदवले असून कुमरी ता. गडहिंग्लज येथे १४ जून २००६ नोकरीची सुरुवात केल्यानंतर चंदगड तालुक्यातील केंद्र शाळा दाटे व सध्या कानडी शाळेत कार्यरत होते.  गेल्या काही वर्षापासून नेसरी येथे स्वतःचे घर बांधून राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली असा परिवार असून या घटनेमुळे त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे. चंदगड तालुक्यात सर्वांना सहकार्य करणारे तंत्रस्नेही व क्रीडा शिक्षक म्हणून ते परिचित होते.
     मार्च महिन्यात सेवानिवृत्त झालेले कामेवाडी ता. चंदगड शाळेचे मुख्याध्यापक मनोहर खादरवाडकर यांचाही कोरोना मुळे सेवानिवृत्तीनंतर महिन्याभरातच मृत्यू झाला. याशिवाय तालुक्यातील बरेच शिक्षक कोरोना पॉझिटिव होऊन उपचार घेत आहेत. या सर्व घटना पाहता शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना गरजेची असलेली सुरक्षा साधने आणि पन्नास लाखांच्या विमा सुरक्षा कवचचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न

Spread the love  चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *