बेळगाव : निलजी विभाग महाराष्ट्र एकिकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
आज शनिवार दिनांक 26 जून 2021 रोजी निलजी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
निलजी गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गोपाळ पाटील पाटील, ता. पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके व सागर कोलकार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शुभम शेळके यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याबद्दल यावेळी माहिती दिली, त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
श्री. नारायण पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी भावकाण्णा मोदगेकर, रवी निर्मळकर, राजू मुतकेकर, ग्राम पंचायत सदस्य मधू मोदगेकर, रमेश मोदगेकर, भरत पाटील, बसवंत प्रभुजी, कृष्णा मोदगेकर, वसंत सुतार, किरण मोदगेकर, कपिल पाटील, कल्लाप्पा मोदगेकर, शामराव पाटील, यल्लप्पा पाटील, नारायण गोमानाचे, पिराजी मोदगेकर, लखन मोदगेकर, भरत वरपे, दत्तात्रय मोदगेकर, शिवराम देसाई, नारायण अक्षमनी, विनोद पाटील, योगेश मोदगेकर, संतोष पाटील, यल्लप्पा पाटील उपस्थित होते.
युवा समितीच्यावतीने सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, वासू सामजी, विनायक कावळे, आशीर्वाद सावंत, सिद्धार्थ चौगुले, अश्वजित चौधरी, जोतिबा पाटील, आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुनिल पाटील यांनी केले.
Check Also
सन्मित्रच्या खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : येळ्ळूर येथील सन्मित्र फौंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुलामुलींच्या खो-खो स्पर्धा रविवार …