निपाणी : बोरगाव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. ही लाट ओसरावी यासाठी महिला व बाल विकासमंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून निपाणी मतदारसंघात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. शिवाय इतर सोयी सुविधा पुरवित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करीत असल्याचे ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील यांनी सांगितले. बोरगाव येथे १८ वर्षावरील दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. वाशीखान मंदिरात लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्याधिकारी संदेश रवळूकेदारी, भाजप प्रमुख दादासो भादुले, शिशु ऐदमाळे, राणी बेविनकट्टी, पिंटू बेवीनकट्टी, आयुब मकानदार, परवेज अपराज, शिवाजी भोरे, कोकिला गस्ती, नारायण अडेकर, अजित तेरादाळे, मीना भादुले, महिपती खोत, काकासाब वाघमोडे, कल्लु फिरगन्नवर, यशराज भोरे, पंडित हिरेमणी, रवी भोरे यांच्यासह नगरसेवक, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कुमुदिनी महाजन यांनी स्वागत केले. तर आरती बंकापुरे यांनी आभार मानले.
Check Also
शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …