खानापूर (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) गावातील ३०० नागरिकांनी लसीकरणाचा डोस घेतला. बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ उचवडे गावात सोमवारी दि. २८ रोजी करण्यात आला.
यावेळी बैलूर ग्राम पंचायत अध्यक्षा व उचवडे गावच्या सौ. अनुसया लक्ष्मण बामणे यांनी कोविड लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, ग्राम पंचायतीचे सदस्य तसेच लसीकरण कार्यक्रमाला डाॅक्टर, नर्स, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्तीस तसेच गावचे नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta