बेळगाव वार्ताच्या बातमीने येळ्ळूर ग्राम पंचायत खडबडून जागे
येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य पसरले होते त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याची लवकरात लवकर उचल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. सदर घटनेची बेळगाव वार्ताने दाखल घेत आवाज उठवला आणि अवघ्या तासाभरात येळ्ळूर ग्रामपंचायतीने कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ केला.
Belgaum Varta Belgaum Varta