IND vs WI: पहिल्या T20च्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताने जिंकला सामना!
भारताने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला तोही 7 चेंडू बाकी ठेऊन.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 च्या स्कोअरबोर्डवर नजर टाकली तर भारताला 19व्या ओव्हरमध्ये विजय मिळालेला दिसून येतो. पण, खर्या अर्थाने त्यांचा विजय डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्येच निश्चित झाला होता. भारताने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला तोही 7 चेंडू बाकी ठेऊन. या विजयासह भारतीय संघ 3 टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडीवर आला आहे. या मालिकेतील पुढील दोन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जाईल. म्हणजेच पहिल्या T20 मध्ये जशी परिस्थिती दिसली होती तशीच परिस्थिती असणार आहे. पहिल्या टी-20 मधील टीम इंडियाचा विजय अखेर डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कसा ठरला हे सांगणे मनोरंजक आहे.
रोहित शर्माने सिक्सर ठोकत सामना जिंकण्याची खात्री केली होती.फक्त भारतीय खेळातील ते दुसरे ओव्हर लक्षात ठेवा. रोमारियो शेफर्डच्या त्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. आणि, त्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्क्वेअर लेगमध्ये सिक्सर ठोकला. चेंडू नेमका स्लॉटमध्ये पडला होता, जो भारतीय कर्णधाराने हवेत फेकला आणि सीमापार नेला होता. या सामन्यातील भारतीय डावातील हा पहिला सिस्कस होता आणि रोहित शर्माच्या डावातील हा पहिला सिक्सक ही होता. आणि या सिक्सरने भारताचा विजय सामन्यात निश्चित झाला.
आता तुम्ही म्हणाल हे असं का बरं? तर याचे उत्तर असे आहे की, रोहित शर्माने कर्णधार म्हणून आजवर जितके सिक्सर मारले आहेत त्या त्या वेळी भारत झिंकला आहे. आणि, चालु सामन्यातही पुढे जाऊन तेच पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने विराट आणि पंतचा झटपट विकेट घेत सामना आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला. पण, सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
रोहितने जिंकलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 350 षटकार पूर्ण केले.वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये रोहित शर्माने 19 चेंडूत 210.52 च्या स्ट्राईक रेटने 40 धावा केल्या होत्या. त्याच्या खळीत 4 चौकार आणि 3 सिक्सरचा समावेश होता. या 3 सिक्सरमध्ये रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 350 हून अधिक सिक्सर मारणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.