Sunday , September 8 2024
Breaking News

धक्कादायक! ब्लॅक फंगसमुळे मुबंईत तीन मुलांचे काढले डोळे

Spread the love

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसीस)चा धोका वाढत आहे. या आजाराने लहान मुले आणि १६ वर्षांपर्यंतच्या तरुणांना लक्ष्य केले आहे. हा आजार इतका गंभीर रुप धारण करत आहे की, त्यामुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. ही तीनही मुले वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होती. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले असून या आजाराच्या भयानकतेमुळे डॉक्टरही चिंतीत आहेत.

फोर्टिस हॉस्पिटलचे सीनिअर कन्सल्टंट पीडियाट्रिशियन डॉ. जेसल शहा यांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन मुलांना ब्लॅक फंगस झाला होता. आमच्याकडे उपचारासाठी आल्यानंतर ४८ तांसांत त्यांचा एक डोळा काढावा लागला.

ब्लॅक फंगस त्यांचे नाक, डोळा आणि सायनसपर्यंत पसरला होता. सुदैवाने हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहाचला नव्हता. सहा आठवडे या मुलांवर उपचार सुरू होते. तरीही या मुलांचा एक डोळा काढावा लागला. डोळे आणि पृथेश शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार ४ आणि ६ वर्षांच्या मुलांमध्ये ब्लॅक फंगस आढळला आहे. दोन्ही मुलांचा एक डोळा काढावा लागला. या मुलांना कोरोना झाला होता. मात्र, त्यांना मधुमेह नव्हता. १४ आणि १६ वर्षांच्या मुलींमध्ये कोरोनानंतर मधुमेह झाल्याचे लक्षात आले. १४ वर्षांच्या मुलीचा एक डोळा काढावा लागला. तर १६ वर्षीय मुलीच्या पोटात ब्लॅक फंगस आढळला आहे. या दोन्ही मुलींना कोरना होण्याआधी मधुमेहाचा त्रास नव्हता.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love    सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *