Thursday , December 5 2024
Breaking News

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Spread the love

राजू पोवार : मंगावते माळमध्ये स्वयंप्रेरणेने शाखेचे उद्घाटन
निपाणी : केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. शिवाय जाचक कायदे व इतर नियमावलीमुळे शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्‍यांना कसलीही अडचण असेल तर आपण कधीही हजर असून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिली. अलीकडच्या काळातील वीज समस्या, ऊस दर, महापूर इत्यादी समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. शेतकरी बांधवांच्या कोणत्याही समस्येसाठी हाकेला धावून येणारी रयत संघटनेबद्दल शेतकर्‍यांना विलक्षण आकर्षण आणि प्रेम आहे. त्या प्रेमापोटी बेनाडीमधील मंगावते माळ येथील अनेक युवा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी राजू पोवार बोलत होते.
ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर यांनी, युवकांच्या एकजुटीची गरज व्यक्त केली. तर निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांना राजू पोवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. संघटनेचे कार्याध्यक्ष प्रविण सुतळे यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. निपाणी तालुका अध्यक्ष आय. एन. बेग यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जैनवाडी शाखा अध्यक्ष नामदेव साळुंखे, बुदिहाळचे बाळासाहेब पाटील, आडी येथील कुमार पाटील, बाबासाहेब पाटील, शंकर मंगावते, वसंत मंगावते, विजय मंगावते, अक्षय पाटील, प्रदीप तावदारे, प्रविण जनवाडे, संजय जनवाडे, केशव शिंदे, संजय कांबळे यांच्यासह शेतकरी व रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अजित सगरे यांचे निधन

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *