Sunday , September 8 2024
Breaking News

जमिनीची कागदपत्रे थेट शेतकऱ्यांच्या घरात

Spread the love

पालकमंत्र्यांच्या हस्ते धामणे गावात योजनेला प्रारंभ
बेळगाव : देशात प्रथमच कर्नाटकात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते शेतकऱ्यांच्या घरात थेट कागदपत्रे देण्याच्या अभिनव योजनेला सुरुवात करण्यात आली असून या योजने अंतर्गत बेळगावमधील धामणे या गावात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते चालना देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन जमिनीची कागदपत्रे देण्याच्या अभिनव योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत मोफत कागदपत्रे शेतकऱ्यांच्या घरी वितरित करण्यात येत असून या योजने अंतर्गत बेळगावमध्ये धामणे या गावात पालकमंत्र्यांनी कागदपत्रांचे वितरण केले आहे. यासंदर्भात माहिती देताना पालकमंत्र्यांनी सांगितले कि, या योजनेसाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या वर्षात ६.१३ लाख लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर करण्यात आली असून राज्यातील विविध समाज सुरक्षा योजनांसाठी सुमारे ७२ लाख लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे. सब रजिस्ट्रार यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विक्रीसाठी ३१ मार्च पर्यंत १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. महसूल विभागातील डीम्ड वनजमीन मिळविण्यासाठी पावले उचलण्यात आली असून भूसंपादन कायद्यात सुधारणा करून उद्योगांना मदत करण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तसेच प्लॉट खरेदीवरील करात देखील कपात करण्यात आली असून दहा विविध योजना पंचायत स्तरावर सुरु करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.


यावेळी दक्षिण आमदार अभय पाटील, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, ए. सी. रवींद्र करलिंगन्नावर, ग्राम पंचायत अध्यक्षा योगिता बेन्नाळकर, मंजुळा मेलिनमानी, राजू बडिगेर, गीता पाटील, मनोहर पाटील, पंडित पाटील, करेव्वा नाईक आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *