Sunday , July 26 2026
Breaking News

श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ

Spread the love

बेळगाव : श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाले.
श्री मंगाई देवी युवक मंडळाने फुलांचा वर्षाव करत सर्व महिलांचा स्वागत सत्कार केला. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले समाजसेवक अभिषेक कलघटगी, निकिता कलघटगी, समाजसेविका माधुरी जाधव, नगरसेविका सारिका पाटील, नगरसेविका दिपाली टोपगी, रिटा पाटील, संतोष टोपगी, शशिकांत चव्हाण, विनायक पाटील, महेश धुडूम या सर्वांचे मंडळाच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर निकिता कलघटगी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कोरोना योद्धा आणि बेळगावच्या पहिल्या महिला अंबुलन्स ड्रायव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व महिलांना संदेश दिला की ज्या महिलांचा वर अन्याय होत आहे त्या महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा. त्याच बरोबर महिलांनी पुढे येऊन रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवावा असे आव्हान केले. त्याच बरोबर नगरसेविका सारिका पाटील यांनी भागातील काहीही समस्या असतील आपण सोडवून देऊ आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले. यानंतर समाजसेवक अभिषेक कलघटगी यांच्या हस्ते स्टंपचे पूजन करून क्रिकेट खेळाचे उद्घाटन करण्यात आले. गीता पाटील यांच्या हस्ते टॉस उडवण्यात आला. महिला दिवस असल्याकारणाने नगरसेविका सारिका पाटील यांच्या हस्ते चेंडू फळी खेळून खेळाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मंगाई देवीच्या परिसरातील महिला आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *