Thursday , September 19 2024
Breaking News

मार्गारेट अल्वा पत्र लिहून करणार पाठिंबा देण्याची मागणी!

Spread the love

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत दौपद्री मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून उमेदवार मार्गारेट अल्वा तर एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांच्यात लढत आहे. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा यांनी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. मार्गारेट अल्वा यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड होणारी पहिली महिला ठरण्यासाठी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे.

सर्व खासदारांना पत्र लिहिणार

मार्गारेट अल्वा यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत योगदान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर अल्वा यांची पहिल्या महिला उपराष्ट्रपतीपदी निवड व्हावी, यासाठी पाठिबा मिळण्यासाठी सर्व खासदारांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. मार्गारेट अल्वा यांनी प्रचार सुरु करण्याआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सांगितलं आहे की, मी एक महिला आहे आणि देशात उपराष्ट्रपती पदासाठीची पहिली महिला उमेदवार आहे. त्यामुळे सर्वांनी मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन करते. मी सर्व खासदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याचं आवाहन करणार आहे.

मार्गारेट अल्वा यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत काम केलं आहे. त्यामुळे आपण उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनाही पत्र लिहिणार का अशी विचारणा केली असता अल्वा यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी एक खासदार असल्याने त्यांनाही पत्र लिहिणार आहे.

केजरीवाल आणि बोम्मईंना पाठिंबा देण्याचे आवाहन

अल्वा यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मिळण्यासाठी नेत्यांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर मार्गारेट अल्वा यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी संपर्क साधला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या विरोधात असणाऱ्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करणार असल्याचं अल्वा यांनी सांगितले आहे.

दिल्लीत शरद पवार यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्याआधी भाजपप्रणित एनडीएकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 6 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *